"विश्‍व बंधुत्वाचा संदेश’ या विषयावर श्रेयस बडवे यांच्या कीर्तनाचे आयोजन...


पुणे :(सह्याद्री बुलेटिन )वयाच्या आठव्या वर्षा पासून कीर्तन सेवेत रत असणारे आणि महाराष्ट्रात सर्वत्र गाजत असलेल्या "कीर्तनजुगलबंदी" या कार्यक्रमाचे मुख्य कलाकार श्रेयस बडवे यांच्या कीर्तनाचे आयोजन शनिवार, दिनांक 8 सप्टेंबर 2018 रोजी सायंकाळी 5.30 वाजता टिळक स्मारक मंदीर, सदाशिव पेठ येथे ‘विवेकानंद केंद्र कन्याकुमारी’ पुणे शाखा च्या वतीने करण्यात आले असून कीर्तनकार श्रेयस बडवे हे संत शिरोमणी ज्ञानेश्‍वर माऊली आणि स्वामी विवेकानंद यांनी सांगितलेला ‘विश्‍व बंधुत्वाचा संदेश’ कीर्तनाच्या माध्यमातून सादर करणार आहेत, अशी माहिती विवेकानंद केंद्र ,पुणे नगरचे संचालक जयंत कुलकर्णी यांनी दिली.

Review